गांधींच्या स्त्रियांविषयीच्या धारणांचे संशोधन
सुजाता पटेल
०५ मार्च २०२१
स्त्रियांविषयीच्या गांधींच्या कल्पना वा धारणा या विषयावर मी १९८८ मध्ये एक अभ्यासलेख लिहिला होता. स्त्रियांसाठी “स्वतंत्र क्षेत्रा”ची (separate sphere) कल्पना त्यावेळी भारतात, व जगभरातही, प्रचलित होती, तिचा पुरस्कार गांधींनीही केलेला. गांधी हे स्त्रीवादी होते हे तत्कालिन स्त्री अभ्यासकांचे मत खोडून काढणारी मांडणी मी त्या लेखात केली होती. याच मुद्द्याची अधिक सखोल चर्चा मी या अभ्यासलेखामध्ये केली आहे…